प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
-, सोनई पोलीस स्टेशन गुरनं १६४/२०२५बिएन एस कलम १०९ (१) या गुन्हयातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर, वय २२ रा.सोनई, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर यास दिनांक २ रोजी सोनई येथे जमावाकडून मारहाण झाल्याने त्यास औषधोपचारकामी जिल्हा रूग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते.आरोपीवर औषधोपचार चालू असताना तो पोलीसांची नजर चुकवून दि.७ रोजी रात्री पळून गेला होता .याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं ५१३/२०२५ बिएनएस चे कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी ने पलायन केलेल्या घटनेची माहिती मिळताच मा.राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांनी पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांचे एक पथक तयार करुन आरोपींचा शोध घेणेकामी रवाना केले.
दिनांक ७ रोजी पथक पळून गेलेल्या आरोपीचा गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना तो सिध्दार्थनगर येथील काटवनात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने सिध्दार्थनगर येथील सारडा कॉलेज पाठीमागील काटवनात संशयीत आरोपीचा शोध घेत त्याच्या नावाची खात्री करत त्यास ताब्यात घेतले त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर, वय २२, रा.सोनई असल्याचे सांगीतले.
ताब्यातील आरोपी यास सोनई पोलीस ठाण्यात गुन्हयाचे तपासकामी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहेत.
सदर ची कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
सोनई येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील तीन पैकी संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर व अमोल साप्ते असे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीच्या शोधकामी पोलीस पथक रवाना झाले आहे.