प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त केज उपजिल्हा रुग्णालयात भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा(काकाजी)यांच्या हस्ते केज येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांना गुलाब फुल देऊन त्या करत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .केंद्रे साहेब,वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख व उपसभापती डॉ .वासुदेव नेहरकर ,डॉ दिनकर राऊत ,तालुका अध्यक्ष भगवान केदार,व्यापारी महासंघाचे श्री महादेव सूर्यवंशी, सुनील घोळवे,संतोष जाधब,खदीर कुरेशी, सुरेश नांदे सर,दत्ता सावंत, अर्जुन बनसोडे सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.