पूणे - (श्रीमंत लष्कर) इंग्रजाच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी घरादारावरती तुळशीपत्र ठेवून भारतीय स्वतंत्र्याच्या यज्ञ कुंडात आहूती देण्याऱ्या आंध्र प्रदेशातीत थोर स्वातंत्र्य सेनानी वड्डे ओबान्ना यांचे स्मरण सर्व भारतीयानी गर्वाने करावे. भारतातीत वडार समाजाने त्यांच्या जयंती दिनी त्याचे स्मरण करावे, असे आव्हान ज्येष्ठ साहित्यिक टी एस चव्हाण यांनी आवाहन केले.
कोल्हापूर साहित्य संस्था व पूणे साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानावरून बोलताना आवाहन केले.
वड्डे ओबान्ना यांचे प्रतिमेचे पूजन मा. कर्नल ऋषिकेश धोत्रे, लातूर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते हरिष बंडीवडार, पुणे यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. सुनिल चौगुले, कोल्हापूर यांनी केले. वड्डे ओबान्ना यांचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान या विषयी प्रा. दिलीप जाधव, सांगली यांनी माहीती दिली. कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त राज्य शिक्षण संचालक एस एन पवार (सोलापूर ), शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे, अहिल्यानगर, लेखक व अभियंता सतिश पवार, कोल्हापूर, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. श्रीमंत लष्कर यांनी केले.