shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची दिवाळी नवीन घरात साजरी होणार.

प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी:-                            

केज मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांची दिवाळी नवीन घरात साजरी होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून व अधिकारी वर्गांना सुचना करुन केज मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या नव्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला आहे. 



त्यामुळे लवकरच घरकुल लाभार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे . यासाठी दिवाळी नवीन घरकुलात या तालुकास्तरिय कार्यशाळेचे उद्घाटन करून सविस्तर मार्गदर्शन केज मतदारसंघाच्या आ.नामीताताई अक्षय मुंदडा यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री आदित्य जीवने, गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने मॅडम, उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर,तालुका अध्यक्ष भगवान केदार, नेताजी शिंदे,सुनील गलांडे,मुरलीधर ढाकणे,महादेव सुर्यवंशी, राहुल गदळे, सुदाम पाटील,सुनील घोळवे, अरुण चाटे ,शरद इंगळे,व तालुक्यातील सरपंच,ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगर सेवक व मोठ्या प्रमाणात केज मतदारसंघातील घरकुल लाभार्थी तसेच सर्व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम तांबवा येथील मंगल कार्यालयात पार पडला.

close