shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी उपनगराध्यक्षांवरील हल्ला अपघात नव्हे, ठार मारण्याचा कट! तीन आरोपी अटकेत.

माजी उपनगराध्यक्षांवरील हल्ला अपघात नव्हे, ठार मारण्याचा कट! तीन आरोपी अटकेत.

एरंडोल, जि. जळगाव (प्रतिनिधी)
– एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर १४ जून रोजी झालेला हल्ला हा कोणताही अपघात नसून, ठार मारण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब निष्पन्न झाली असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सीसीटीव्हीने उघड केली कटाची योजना.

दशरथ महाजन यांच्यावर एरंडोल-भालगाव रस्त्यावर बोलेरो कारने जोरदार धडक दिली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, महाजन यांच्या पत्नी व माजी नगरसेविका कल्पना महाजन यांच्या फिर्यादीनंतर, राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची शक्यता तपासली गेली. तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने हा खूनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.

तीन आरोपी अटकेत, बोलेरो कार जप्त.

पोलीस पथकाने केलेल्या तपासात आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९), आणि पवन कैलास महाजन (वय २०, सर्व रा. एरंडोल) यांना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे उमेश सुतारने मान्य केले. या प्रकरणात वापरलेली बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे.

30 जूनपर्यंत पोलीस कोठडी...

अटक केलेल्या आरोपींना प्रथमवर्ग न्यायालय, एरंडोल येथे हजर केले असता, ३० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील PSI सोपान गोरे करत आहेत.

पोलीस पथकाचे उल्लेखनीय कार्य...

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, PSI शरद बागल, सोपान गोरे, आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले. विशेषतः पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे व राहुल कोळी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली.


close