shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेस १६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..


📰 शिर्डी एक्सप्रेस १६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

प्रतिनिधी – शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा

शिर्डी एक्सप्रेस वृत्तपत्राचा १६ वा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा, संपादक रमेश जेठे (सर) यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जल्लोषात पार पडला.

या गौरवमयी कार्यक्रमास हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शेजारी जेष्ठ पत्रकार मनोजकुमार शंकरराव आगे, डॉ. बबन जोगदंड (२५ डिग्री प्राप्त), जेष्ठ साहित्यिक टि.एस. चव्हाण, मा.नगरसेवक नितीन भाऊ वाघमारे (लातूर) तसेच सामाजिक कार्यकर्ते रवि जी शिंदे यांचा मान्यवर म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.  


या कार्यक्रमात २९ समाजहितैषी व्यक्तींना "महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५" प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजसेवा, साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, कृषी, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि सहभागाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाची शान वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे विशेष अभिनंदन करत, शिर्डी एक्सप्रेस वृत्तपत्राने समाजप्रबोधनासाठी आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केले.

close