अहिल्यानगर / प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चांदा येथील निकाळजे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुधाकर निकाळजे व चांदा येथील शनी सेवा फाऊंडेशनच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन चांदा, देवळाली प्रवरा , मढी , रस्तापूर दिंडीतील वारकऱ्यांना मोफत उपचार करत रुग्णसेवा दिली.
डॉ सुधाकर निकाळजे व शनिसेवा सोशल फाऊंडेशन वतीने दिंडी प्रस्थाना अगोदरच दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी वाटेत येऊन मोफत रुग्णसेवा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे आज डॉ. निकाळजे , शनीसेवा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश शेवाळे व सदस्यांनी वारकऱ्यांना दिंडी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन रुग्णसेवा दिली. बहुतांशी दिंड्या ह्या मिरजगांव, चापडगांव याच परिसरात मुक्कामी होत्या, चांदा येथील वै .गुरुवर्य ह भ प श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज दिंडी सोहळा , श्रीदत्त साधकाश्रम चांदा वै.गुरुवर्य रोहिदासजी महाराज दिंडी सोहळा, श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ दिंडी सोहळा , रस्तापुर येथील ज्ञानेश्वर दिंडी सोहळा हभप नितीन हारकळ महाराज, तर देवळाली प्रवरा येथील त्रिंबकस्वामी महाराज दिंडी सोहळा या दिड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन तेथील रुग्णांची तपासणी करून योग्य ते औषधोपचार दिले.
यावेळी २४१ रुग्णांची निकाळजे हॉस्पिटलच्या वतीने तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले .सुरुवातीला प्रत्येक दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर महाराजांचे व दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तेथील रुग्णांचे विचारपूस करून त्यांना औषधोपचार देण्यात आले .आनंद मेडिकल चे वृषभ गांधी व जय माता दि मेडिकल चे संचालक निरज मनोचा यांच्या वतीने सर्व औषधे देण्यात आले आहेत. यावेळी शनीसेवा सोशल फाऊंडेशनचे बंडू दहातोंडे, चंद्रकांत जावळे, शिवाजी मोतीराम दहातोंडे, संजय वैरागर आदींसह निकाळजे हॉस्पिटल स्टाफ व शनीसेवा सोशल फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार कमलेश शेवाळे (देवा) चांदा
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111