shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलच्या अंजनी नदीवरील लहान-मोठा पुल धोकेदायक ? - चर्चा

आ. अमोल दादा पाटील यांचेकडे गार्‍हाणे मांडणार-नागरीक...

एरंडोल (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी पुल दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून अशा प्रकारची घटना राज्यात कोठेही घडू नये म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील सर्वच जुन्या अथवा धोकेदायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. त्या अनुषंगाने एरंडोलचे नवनिर्वाचित आमदार अमोलदादा पाटील यांनी (शिंदे गट) देखील एरंडोलच्या अंजनी नदीवरील लहान पूल (जूना इंग्रज काळातील) आणि मोठा पूल यांचे स्ट्रक्चरल ऑडीटसाठी प्रयत्न करावेत या मागणीसाठी लवकरच शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती मिळाली असून सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. 

 याबाबतची माहिती अशी की, एरंडोलची अंजनी नदी (ऐतिहासिक वारसा) बारमाही वाहणारी नदी असली तरी तिला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळा सुरू झाला तरी स्वच्छता नाही (अर्थात फोटोसाठी एरंडोल नपाने मात्र फुशारकी मारली आहे) लहान पूल (फरशी) कमकुवत झाला असल्याचे सर्वश्रृत असले तरी वाहतुक कमी असल्याने सध्या धोका नसला तरी भविष्यात मोठा धोका होवू शकतो हेही तेवढेच खरे. जी गोष्ट लहान पुलाची तीच गोष्ट मोठ्या पुलाची असल्याने एरंडोल आणि परिसरातील नागरीकांमध्ये आतापासूनच भितीचे वातावरण पसरले आहे. आमदार अमोलदादा पाटील यांनी एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

close