shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासकीय ज्वारी केंद्रामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल - आमदार अमोल पाटील.

शासकीय ज्वारी केंद्रामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल - आमदार अमोल पाटील.

एरंडोल
-शासनाने सुरु केलेल्या शासकीय ज्वारी खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल पाटील हे एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघात सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्राच्या काटापूजन प्रसंगी ते बोलत होते.

    तालुका शेतकरी सहकारी संघात यावर्षी ९५१ शेतक-यांनी नोंदणी केली असून संघाला यावर्षी तीन हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.ज्वारीसाठी तीन हजार ३७१ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.आमदार अमोल पाटील यांचे हस्ते खरेदी केंद्रावर काटापूजन करून शुभारंभ करण्यात आला.

      यावेळी आमदार अमोल पाटील यांनी यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी खरेदी केंद्रावर शेतक-यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेवून सहकार्य करण्याची सुचना केली.शासकीयज्वारी केंद्रामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.शासनाने ज्वारीचा विक्रमी भाव जाहीर केला असून शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, आडगावचे उपसरपंच डी.एन.पाटील,तहसीलदार प्रदीप पाटील यांचेसह शेतकी संघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.


close