वन महोत्सव (15 जून ते 30 सप्टेंबर 2025) कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना वृक्षवाटप; मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रम उत्साहात पार.
एरंडोल - वन महोत्सव 2025 (15 जून ते 30 सप्टेंबर) या कालावधीत "एक पेड मा के नाम 2.0" या उपक्रमांतर्गत जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारची झाडे विद्यालय परिसरात लावण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री अमित दादा पाटील, वनरक्षक श्री मधुकर पवार, डीडिएसपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य श्री अरविंद बडगुजर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण केदार, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री नरेंद्र गायकवाड, वन विभागाचे श्री युनुस शेख व श्री राजेंद्र देवरे, तसेच श्री गोरख गायकवाड, श्री शेखर पाटील, श्री नितीन पाटील, श्री मनोहर बोरसे, श्री प्रदीप पाटील भाऊसाहेब, श्री कृष्णा पाटील व रोहित वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना झाडांचे वाटपही करण्यात आले. "एक पेड मा के नाम" उपक्रमात घराघरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्कृष्ट प्रकारे पार पडले असून पर्यावरणप्रेमी उपक्रम म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.