shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तीनशे महिलांना व विद्यार्थिनीं घेतला लाभ.

 
सेवा संयोग संस्थेकडून मोफत सॅनिटारी पॅड वाटप.

सेवा संयोग संस्थेकडून मोफत सॅनिटारी पॅड वाटप.   

प्रतिनिधी पिंपळे:-चिमणपुरी पिंपळे खुर्द येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौं वर्षाताई युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले सेवा सहयोग फौंडेशन पुणे संचलित ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत चिमणपुरी पिंपळे येथे दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता श्री गुरुदेव दत्त मंदिर प्रांगणात शिबिराची सुरुवात जिजाऊ मातांची प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. 

यावेळी व्यासपीठा वरून डॉ रुपाली दिनेश पाटील व डॉक्टर दिनेश गोकुळ पाटील धन्वंतरी हॉस्पिटल अमळनेर हे दोन्ही वय वर्षे १२ ते ३५ वर्षे वयोगटातील माता भगिनींसाठी"वैयक्तिक स्वच्छता"या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच महिला आणि शालेय विद्यार्थिनींना सॅनिटारी पॅड मोफत वाटप करण्यात आले.

 तरी सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा वैयक्तिक स्वच्छते साठी वापरात असलेल्या सॅनिटरी पॅडचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांनी विद्यार्थ्यांनी घेतला.सेवा सहयोग फौंडेशन, पुणे यांचे सहकारी छाया इसी मॅडम आरोग्य सेविका साधना पाटील,आशाबाई पाटीलअंगणवाडी सेविका लताबाई चौधरी ,निर्मला चौधरी मदनिस, सुवर्णा पाटील,सोनाली पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील ,शिक्षिका, विद्यार्थिनी व ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील माता भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथम लोकनियुक सरपंच सौं वर्षाताई युवराज पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक के लंकेश यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन आभार शिरसाट मॅडम यांनी केले

close