shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोदय स्कॉलरशिप परीक्षेत आराध्या महाजनला पाचवा क्रमांक; गोल्ड मेडल व रोख पारितोषिक मिळवले.

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोदय स्कॉलरशिप परीक्षेत आराध्या महाजनला पाचवा क्रमांक; गोल्ड मेडल व रोख पारितोषिक मिळवले.

एरंडोल, प्रतिनिधी –
एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी आराध्या कृष्णा महाजन हिने सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षा २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक पटकावून मेरिट यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

ही परीक्षा कालिकत, केरळ येथील संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. परीक्षेत यशस्वी ठरल्याबद्दल आराध्याला गोल्ड मेडल, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात आले.

आराध्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन, व्हाइस प्रिन्सिपल सरला पाटील, वर्गशिक्षिका अश्विनी महाजन, तसेच कल्पना खुणेपिंप्रे, तुळसाबाई खुणेपिंप्रे, हेमलता महाजन, भगवान महाजन, मनोहर महाजन, महेश महाजन, कविता महाजन आणि प्रशांत महाजन यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

आराध्या ही विखरण येथील रहिवासी कृष्णा अरुण महाजन आणि देवयानी महाजन यांची कन्या असून, ती सामाजिक कार्यकर्ते कै. अरुण ओंकार खुणेपिंप्रे यांची नात आहे.

आराध्याच्या यशामुळे संपूर्ण कुटुंब, शाळा व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


close