प्रवाशांसाठी आधुनिक सोयी-सुविधांचा शुभारंभ – बसस्थानकाचा कायापालट होणार.
प्रतिनिधी – एरंडोल
एरंडोल बसस्थानक व आगाराच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल ४ कोटी रुपयांची विकासकामे लवकरच सुरू होणार असून, त्याचे भूमिपूजन आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कामांतर्गत वाहनतळाचे काँक्रीटीकरण, प्रवाशी प्रतिक्षालयात ग्रेनाईट बेंच, हिरकणी कक्ष, रंगरंगोटी आदी सुविधा निर्माण होणार आहेत.
या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, बाजार समिती माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव यांच्या सह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, प्रवासी, परिवहन अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एरंडोल हे जळगाव, धुळे, भडगाव आदी शहरांना जोडणारे महत्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. मात्र येथे पावसाळ्यात चिखल, बसण्याची सोय, पाणी, स्वच्छता आदी सुविधांचा अभाव होता.
माजी आ.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला असून, आमदार अमोलदादा पाटील यांनी हे काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.