shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उत्राण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदी पंकज महाजन व सौ. सुमनताई पाटील यांची बिनविरोध निवड.

उत्राण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदी पंकज महाजन व सौ. सुमनताई पाटील यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी – एरंडोल / उत्राण

उत्राण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पंकज प्रकाश महाजन व व्हा. चेअरमनपदी सौ. सुमनताई गोविंदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी पी. जे. पाटील यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली.

या निवड प्रक्रियेसाठी सोसायटीचे सचिव मधुकर पाटील व लिपिक राजू गुरव यांनी निवडणूक कामकाज पाहिले. निवडीनंतर नव्याने निवडून आलेल्या चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी आमदार पाटील यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, "शेतकरी वर्गाच्या सेवा व सुविधांसाठी सोसायटीच्या माध्यमातून भरीव कार्य व्हावे अशी अपेक्षा आहे. सोसायटी ही गावाच्या विकासाची शक्ती असते. त्याचे भान ठेवून कार्य करणे गरजेचे आहे," असे मत व्यक्त केले.

सत्कार कार्यक्रमास पं.स. सभापती अनिलभाऊ महाजन, मा. तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, पन्नाभाऊ सोनवणे (खेडी), सौ. सुमनताई पाटील (शेतकी संघ), बाळुआण्णा धनगर, गुरुदास चौधरी, पांडुरंग जाधव, रघुनाथ कुंभार, विलास महाजन, ईश्वर धनगर, विजय महाजन, ज्योती महाजन, संजय महाजन, ज्ञानेश्वर पाटील, भारत देवरे, महादु कोळी, धनराज पाटील, हारूण देशमुख, अंतुर्लीचे सरपंच गौरव पाटील, ताडे सरपंच सचिन पाटील, शरद ठाकुर (निपाणे ग्रामपंचायत सदस्य) आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळाव्यात, सहकार चळवळ बळकट व्हावी, व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रामाणिकपणे कार्य करू, असे आश्वासन चेअरमन पंकज महाजन व व्हा. चेअरमन सौ. सुमनताई पाटील यांनी दिले.


close