भिवंडीत पत्रकार बांधवां साठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न.
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन व स्वराज तोरण ट्रस्टचा संयुक्त उपक्रम.
प्रतिनिधी – भिवंडी
भिवंडी येथे पत्रकार बांधवांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि स्वराज तोरण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांसाठी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचेही लाभ देण्यात आले.
या उपक्रमात श्री. जितेंद्र पाटील यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन’च्या कार्याबाबत मनोगत व्यक्त करत आरोग्य क्षेत्रात सामाजिक सहभागाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोटिवेशनल स्पीकर व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मा.मनोज सानप यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी वळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सचिन सत्यवान पाटील, ग्रामपंचायत अधिकारी राकेश जोशी, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार संध्याताई पवार, राजेंद्र काबाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्य विषयक उपक्रमांची नियमित आवश्यकता व्यक्त केली.