प्रकाश मुंडे बीड जिल्हा प्रतिनिधी. . .....
गणेश उत्सवात कोणताही धांगडधिंगा न घालता एकदम साध्या पद्धतीने गणेश जयंती उत्सव साजरा करुन एक आदर्श निर्माण करण्याचा निर्णय कोणालाही वर्गणी न मागण्याचा निर्णय समस्त शिक्षक कॉलनी भागातील रहिवासी लोकांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.येणारा गणेश उत्सव व इतर सर्वच उत्सव साजरे करताना पारंपरिक व साध्या पद्धतीने, उत्साहात प्रतेक उत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. डिजे चा धिंगाणा व इतर गोष्टी या मुळे टाळल्या जातात. गणेश उत्सवात पारंपरिक देवाची गाणी, पुजा तसेच प्रसाद ठेऊन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शिक्षक कॉलनी, बीड रोड केजच्या नागरिकांचे व युवकांचे या कौतुकास्पद निर्णयामुळे सर्वञ कौतुक केले जात आहे. दत्ता धस पंत,पिटू भैय्या तांदळे, खय्युम शेख, भगवान केदार, सुनील घोळवे, आमर केजकर, राजेश गवळी सर, डॉ विजयकुमार धस, प्रकाश मुंडे, सोनू धस, दिनकर तांदळे सर, प्रशांत मुळे, रवि घुले, अमोल धस, संदीप भुतडा,चंदू चौरे, सुरेश घुले, राजेश मुळे, राजेभाऊ शिंदे, सुर्यवंशी दादा, पाळवदे सर , घुले सर,गोटू पाळवदे, अमोल मुंडे, वैभव केंद्रे,डॉ डापकर साहेब, नवनाथ घुले, राज ढाकणे ,प्रा.मुकूंद घुले सर, रवि अंधारे, विजय अंधारे, गालफाडे तात्या, मयुर भैय्या टकले, डोईफोडे मेजर,विकास मुळे,आतूल ठोंबरे, अमोल ठोंबरे , चौरे साहेब दुकानदार, हांगे सर ,विक्की घोडके, बाबा मुंडे सर व इतर प्रमुख मान्यवर यांनी हा एक चांगला पायंडा मांडला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून, व्यापारी वर्ग, नेते मंडळी, तसेच सामान्य जनतेतुन केज शहरात सर्वञ कौतुक केले जात आहे.