shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळे येथे बालिका स्नेही पंचायततर्फे बालविवाह व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती.

पिंपळे येथे बालिका स्नेही पंचायततर्फे बालविवाह व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती.

प्रभातफेरी, घोषणा, पथनाट्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; जलेबी वाटप करून विद्यार्थ्यांचे कौतुक.
पिंपळे येथे बालिका स्नेही पंचायततर्फे बालविवाह व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती.

पिंपळे (प्रतिनिधी) –

ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे व महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत उपक्रमांतर्गत, कै. सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु. येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून बालविवाहमुक्त व व्यसनमुक्त गावासाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एच. भोसले व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी बालविवाह व तंबाखू-विना गाव होण्यासाठी शपथ घेतली.

विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढून "मुलींचे शिक्षण – प्रगतीचे रक्षण", "पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा", "दारू पळवा – गाव वाचवा" अशा आशयघन घोषणा देत ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

यावेळी समृद्धी ग्रामपंचायत व बालिका स्नेही पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून मुलींवरील अन्याय, बालविवाहाचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व व व्यसनमुक्त जीवनशैली यावर प्रभावी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमास सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, पुरुषोत्तम लोटन चौधरी, निंबा बापू चौधरी, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, ग्रामसेवक के. के. लंकेश, मुख्याध्यापक संजय भोसले, शिक्षक डी. बी. पाटील, सी. एन. पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना जलेबी वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला.

close