shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विठ्ठल रुक्मिणी महिला दूध संस्थेच्या चेअरमनपदी ज्योती पाटील बिनविरोध!

विठ्ठल रुक्मिणी महिला दूध संस्थेच्या चेअरमनपदी ज्योती पाटील बिनविरोध!

उपाध्यक्षपदी राजलक्ष्मी पाटील|दुग्ध व्यवसायात पारदर्शक कारभाराची दखल.

प्रतिनिधी - स्वप्निल पाटील, 

धरणगाव तालुका व जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात नावलौकिक मिळवलेल्या विठ्ठल रुक्मिणी महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, धार या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2025-2030) चेअरमनपदी ज्योती समाधान पाटील व व्हाईस चेअरमनपदी राजलक्ष्मी पंढरीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दिनांक 19 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत दोन पदांसाठी प्रत्येकी एक अर्जच दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेचा कारभार पारदर्शक असल्याने सर्वसामान्य सभासदांचा विश्वास जपला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया ही सहकार खात्याचे श्री. ए.टी. कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पार पाडली.

तालुका प्रथम व विकास लक्ष्मी पुरस्काराने गौरव...

सदर संस्थेला सन 2023-24 साठी तालुका पातळीवरील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. संस्थेचे म्हैस दूध संकलन प्रतिदिन 1200 लिटरवर पोहोचले आहे. यामुळे संस्थेला 2024-25 साठी ‘विकास लक्ष्मी पुरस्कारासाठी’ नामांकन मिळाले आहे.

संस्था येत्या काळात कार्यक्षेत्र विस्तारित करत 1500 लिटर प्रतिदिन दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सचिव सौरभ लखीचंद पाचपोळ, संचालक समाधान पाटील, मयूर कोळी, अमोल पाटील आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


close