shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल.जी बनसुडे विद्यालयात पारंपारिक सणांचे साजरीकरण

-एल.जी बनसुडे विद्यालयात पारंपारिक सणांचे साजरीकरण
इंदापूर : पळसदेव (ता-इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालय मध्ये नागपंचमी सणाचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक सण हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे ते केवळ धार्मिक सण नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा उत्सव आहे व त्याचेच महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्यांच्यामध्ये निसर्गाशी समतोल राखणे हे मूल्य रुजावे या उद्देशाने नागपंचमी सणाचे सादरीकरण करण्यात आले अशी माहिती प्राचार्या वंदना बनसुडे यांनी दिली. संस्थेतील सहशिक्षिका ज्योती मारकड, तनुजा फुगे, मनीषा कुदळे, अर्चना बोंद्रे यांनी  विद्यार्थ्यांच्या मदतीने वारुळाची प्रतिकृती तयार केली तसेच सोजर काळे यांनी रांगोळीचे रेखाटन केले. संकुलातील सर्व महिला शिक्षक यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.इयत्ता प्रि प्रायमरी ते विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी पतंग उडवणे, मेहंदी काढणे, वारूळाभोवती फेर धरणे, फुगडी खेळणे इ.पारंपारिक खेळ करणे इत्यादी उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. आजच्या कार्यक्रमासाठी महिला पालक वर्गांची उपस्थिती लाभली.विद्यार्थ्यांना सापाचे महत्त्व व शेतकऱ्यांन प्रती त्याची उपयुक्तता सांगण्यात आली. पर्यावरणाचा आदर करणे व निसर्ग सोबत जुळवून घेणे हा संदेश देत आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
close