जळगावातील महादेव मंदिरातील चोरी प्रकरणाचा छडा लावून ३३,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत;आरोपींकडून गुन्ह्याची कबुली.
जळगाव (प्रतिनिधी) –
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेव मंदिरात ११ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री चोरीची घटना घडली होती. मंदिरातून चांदीचा मुकुट व वाणी असा सुमारे ₹३३,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणात मंदिराचे पुजारी रवींद्र शंकर गायकवाड (रा. तांबापूरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मंदिर परिसरातील तसेच त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी गुन्हा घडलेल्या मार्गांवर, घटनास्थळाजवळील रस्त्यांवर चौकशी करून, संशयित हालचालींवर लक्ष ठेवत २ चोरट्यांचा छडा लावण्यात यश मिळवलं.
🔍 अटक केलेले आरोपी:
1. शकील शेख ताजुद्दीन शेख (वय – २४) रा. तांबापूरा, जळगाव
2. राहुल शंकर रावळकर (वय – ३२) रा. रामनगर झोपडपट्टी, जळगाव.
या दोघांनी मंदिरातून चोरलेली वाणी व मुकुट विक्री करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या सापळ्यात सापडले. अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून मूळ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
👮♂️ पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी:
या कामगिरीसाठी पोलीस निरीक्षक अर्जुन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.उपनिरीक्षक – प्रदीप भालेराव
पो.ना. – मंगेश कोळी, जनार्दन ठाकूर, राहुल घोटे
व इतर कर्मचारी यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व तत्परतेने तपास करत अवघ्या ४८ तासांत गुन्हा उघडकीस आणला.
👏 नागरिकांकडून पोलीस दलाचे कौतुक.
या जलद आणि अचूक कारवाईमुळे महादेव मंदिर समिती तसेच जळगावकर नागरिकांनी एमआयडीसी पोलीस दलाचे आभार मानले आहेत. धार्मिक स्थळी झालेल्या चोरीसारख्या संवेदनशील गुन्ह्याचा लवकर उलगडा करून पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय दिला आहे.