shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ साहित्यिक नवनाथ रणखांबे,लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि यूएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ने सन्मानित


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 कल्याण - ज्येष्ठ साहित्यिक नवनाथ रणखांबे यांचे  शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले  "प्रेम उठाव"  या पुस्तकांचा सन्मान  लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि यूएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाला आहे.  या पुस्तकांची प्रसार माध्यमातून जोरदार चर्चा झाली आहे, मराठी साहित्य क्षेत्रात 'प्रेम उठाव' या काव्यसंग्रह पुस्तकावर परिक्षणे, आभिप्राय, समीक्षा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त समीक्षक, साहित्यातील जाणकार, सुज्ञ वाचक वर्गांनी केली असून ती दर्जेदार दैनिके, साप्ताहिके, मासिके इ. मध्ये प्रकाशित झाली आहे. 

प्रेम उठाव या पुस्तकावरील १७१ परिक्षणांची ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि यूएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे. त्यामुळे नवनाथ रणखांबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवनाथ रणखांबे  हे विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
*वृत प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close