विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूरच्या हँडबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इंदापूर : सीबीएसई साउथ झोन हँडबॉल स्पर्धा 2025 ही स्पर्धा दि. 24 जुलै 2025 ते 27 जुलै 2025 या कालावधीत साध्वी प्रीतीसुधाजी इंटरनॅशनल स्कूल राहता,ता. राहता जि. अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेसाठी भारतातील साऊथ झोन मधून तमिळनाडू, केरला,कर्नाटका, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा या राज्यातून एकूण 48 संघ आले होते.
इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षा खालील हँडबॉल संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
इंदापूर संघाने पहिला सामना हॅप्पी व्हॅली स्कूल बेंगलुरु यांच्याविरुद्ध 13 - 0, दुसरा सामना एज्यु. एशिया स्कूल, वेल्लोर कर्नाटका यांच्याविरुद्ध 9-0, तिसरा सामना अल्फोंसो स्कूल केरळा यांचे विरुद्ध 8-0 अशा गुण फरकाने जिंकला. उपांत्यपूर्व ,उपांत्य व अंतिम सामन्यात देखील दर्जेदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात इंदापूर संघाने केएलई इंटरनॅशनल स्कूल गोकाक,कर्नाटका या संघास 6-2अशा फरकाने हरवत विजय मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. प्रशिक्षक व मार्गदर्शन म्हणून संभाजी पवार सर यांनी काम पाहिले.
विराज रेडके, देवराज पाटील,सोनिश शहा, अथर्व बोराटे, आदित्य खाडे, विश्वराज ननवरे, प्रत्युष जगताप, वेदांत राऊत,ज्योतिरादित्य बागल,शौर्य गणेशकर, चैतन्य खामगळ, ज्योतिरादित्य राजेभोसले, अजिंक्य यादव, या खेळाडूंनी यासाठी खूप मेहनत घेतली.
पुढील राष्ट्रीय स्पर्धा नोजगे पब्लिक स्कूल श्री गंगानगर राजस्थान(Near India Pakistan Border) या ठिकाणी 8 सप्टेंबर 2025 ते 11 सप्टेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे.