अहिल्यानगर :
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानातील बनावट ॲप घोटाळा आणि अतिरिक्त नोकरभरती प्रकरणाने राज्यात राजकीय खळबळ उडवली असून याचे पडसाद थेट विधानसभेत उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी अहवाल वाचून दाखवल्यानंतर हा घोटाळा राज्यभर चर्चेत आला.
मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात १८ जुलै रोजी देवस्थानच्या विश्वस्त व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. वकिलांनी म्हणणं मांडल्यानंतर सरकारच्यावतीने पुढील सुनावणी २५ जुलैला होणार आहे. या तारखेला काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘प्रकरण मॅनेज झालं, आता फक्त तारीख पे तारीख’ असे दावे करत चर्चा रंगवली. पण ‘शनिदेवाच्या काठीचा आवाज होत नाही’ हे अंतिम सत्य लक्षात घ्यावंच लागेल, असा इशाराही कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
मुख्य घडामोडी –
✅ भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं, उपोषणं झाली.
✅ आ. विठ्ठलराव लंघे व आ. सुरेश धस यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली.
✅ मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी अहवाल वाचून दाखवत घोटाळ्याचं वास्तव उघड केलं.
✅ बनावट ॲप कंपन्यांवर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल – तपास सध्या सायबर विभागाकडे.
✅ २५ जुलैनंतर फौजदारी गुन्हे नोंदवले जाणार का, याची उत्सुकता.
गडाखांच्या मौनावर प्रश्नचिन्ह…!
राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी “माजी मंत्री शंकरराव गडाखांनी शनिदेवाच्या झोळीत हात घातला” असा थेट आरोप केला. भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनीदेखील सातत्याने गंभीर आरोप फेसबुकवर करत आहेत.
तरीही माजी मंत्री गडाख यांनी अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही, हे मौन प्रचंड अनाकलनीय ठरत असून, “गडाख नेमका कोणता डाव टाकणार?” यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.
२५ जुलै – निर्णायक तारीख!
सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निर्णय हा घोटाळ्याच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. त्यामुळे प्रकरण ‘मॅनेज’ होण्याची शक्यता सध्या तरी धूसर दिसत आहे.
👉 हा घोटाळा अजून किती मोठा उलगडणार?
👉 दोषींवर फौजदारी कारवाई होणार की गडबड मॅनेज होणार?
👉 माजी मंत्री गडाख मौन का पाळत आहेत?
याचं उत्तर मिळणार २५ जुल्यानंतर…!