प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
भाजपच्या केज तालुका सरचिटणीस पदी मुंदडा घराण्याचे कट्टर समर्थक सुनील भाऊ घोळवे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे केज तालुक्यातून व नांदूर जिल्हा परिषद गटातून जोरदार स्वागत होत आहे. केज मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी सुनील घोळवे यांना या निवडीतून न्याय दिला आहे असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.
भाजपच्या केज पश्चिम मंडळ सरचिटणीस पदी सुनील घोळवे यांची निवड करण्यात आली आहे. सुनील घोळवे यांना सदर निवडीचे नियुक्तीपत्र भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या हस्ते देण्यात आले .सुनील घोळवे हे बऱ्याच दिवसापासून भाजपचे इमानेइतबारे काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल आमदार नमिता मुंदडा व पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा यांनी घेऊन तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांना त्यांच्यावर भाजप सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकण्यास सांगितले आहे.त्यानुसार भाजप तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी सुनील घोळवे यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.
सुनील घोळवे यांना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ,माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच भाजप पक्ष वाढवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे असे तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले .सुनील घोळवे यांच्या निवडीमुळे भाजपला पक्ष वाढीसाठी निश्चित फायदा होणार आहे या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.