shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फरार अभिजीत राजपूत जेरबंद – LCB ची धडक कारवाई.

 

फरार अभिजीत राजपूत जेरबंद – LCB ची धडक कारवाई.

जळगाव : गेल्या सात महिन्यापासून पोलिसांना हवा असलेल्या रस्तालुटीच्या गुन्ह्यातील फरार सुत्रधारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अभिजीत भरतसिंग राजपूत (रा. मळाणे वणी ता. जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या सुत्रधार लुटारुचे नाव आहे. धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याच्या तपासात तो पोलिसांच्या हाती लागला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. या तपासा दरम्यान चौघा जणांची नावे निष्पन्न झाली होती.

अभिजीत भरतसिंग राजपुत, अक्षय उर्फ घोडा भिमराव पाटील (बागुल), संभाजी पाटील आणि अजय भाईदास थोरात अशी या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील अक्षय उर्फ घोडा यास यापुर्वी अटक करण्यात आली आहे. अभिजीत यास तो रहात असलेल्या धुळे तालुक्यातील मळाणे (वणी) या गावातून शिताफीने अटक करण्यात आली. तो गावात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजली होती. अटकेतील अभिजीत राजपूत याच्याविरुद्ध धरणगाव, अमळनेर, सोनगीर व धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हे.कॉ. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पो.कॉ. राहुल कोळी, महिला कर्मचारी दर्शना पाटील, महेश सोमवंशी आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अभिजीत यास पुढील कारवाईकामी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

close