shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"१०% दृष्टी – पण १००% आत्मविश्वास! ‘साक्षीची राखी’ उपक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद!"

"१०% दृष्टी – पण १००% आत्मविश्वास! ‘साक्षीची राखी’ उपक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद!"

साक्षीच्या राखी स्टॉलला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


वाळकेश्वरवाडी, २६ जुलै २०२५ (प्रतिनिधी):

रोटरी क्लब ऑफ वाळकेश्वरवाडी यांच्या वतीने "साक्षीची राखी" या नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास परिसरातील महिलांकडून आणि मान्यवर व्यक्तींकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

साक्षी ही एम.ए शिक्षण घेणारी होतकरू विद्यार्थिनी असून तिची दृष्टी केवळ १०% आहे. मात्र तिच्या हातातील कलेमुळे तिने सुंदर राख्या तयार केल्या आहेत. तिच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब वाळकेश्वरवाडीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ शिवाजी महाराज चौक येथे एकदिवसीय स्टॉल उभारण्यात आला.

या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन प्रणीता आढळकर यांनी भेट दिली आणि साक्षीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमास विविध सामाजिक संस्था, महिला गट, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थिनींनी उपस्थित राहून साक्षीच्या आत्मनिर्भरतेला बळ दिले.

उपक्रमात सहभागी संस्थांमध्ये माणसी ग्रुप (सौ. जयश्री), भगारे जिजाऊ सोशल फाउंडेशन (सौ. ज्योतीताई भगारे), फिटनेस फॉरेव्हर (सौ. हर्षदा भुमकर), जगदाळे क्लासेस (सौ. विजयादेवी जगदाळे), रोटरी महिला ग्रुप, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन (सौ. करुणाताई चिंचवडे), वाळकेश्वर महिला भजन मंडळ (स्वातीताई वाळकेर) आणि मैत्री स्वावलंबन महिला बचत गट (सौ. अभिजी खोले) यांचा सक्रिय सहभाग होता.

कार्यक्रमात साक्षीच्या राख्या खरेदी करून तिच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यात आले. उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली व महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी अशा उपक्रमांची गरज आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखर अर्जुन चिंचवडे, अनिल चिंचवडे, दत्ता पाटील, ज्ञानेश्वर भगारे, हर्षद भुमकर, दीपाली चौधरी, प्रफुल्ला थोरात, सुरेश चौधरी, तुषार पाटील, मनीषा पवार, संदेश देशमुख, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित जगदाळे व सदस्यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमाने महिलांच्या हातात रोजगार निर्माण करताना समाजात सकारात्मक संदेश दिला. "साक्षीची राखी" उपक्रमाने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला असून रोटरी क्लब वाळकेश्वरवाडीचा हा स्तुत्य उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.



(टीप:- क्लब ऑफ वाळकेश्वरवाडी.)
close