प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील एकविरा माता अदिवासी मुलांच्या निवासीआश्रम शाळेतील ४६ विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाली असून आरोग्य विभागाने दखल घेत कर्मचा-यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून तात्काळ औषधोपचार केले.
जळगाव धुळे महामार्गाच्या बाजूला असलेले पातरखेडे येथील एकविरा माता अदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेतील ४६ विद्यार्थ्यांना गोवर या आजाराची लागण झाल्यामुळे शिक्षणक्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी गोवराची लागण झाल्याचे समजताच संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील,संचालक अजय पाटील यांचे सह शिक्षकांनी मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांचेवर वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक जाधव,यांचे सह वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश चौधरी,डॉ.संदीप गांगुर्डे, डॉ.संकेत पाटील यांनी तपासणी करून प्राथमिक उपचार केले.३२ विद्यार्थ्यांना गोवर या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याने त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर १४ विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गोवर आजार संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले.दि.२६ रोजी सकाळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांचेसह आरोग्य सेवक,परिचारिका यांनी आश्रमशाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार केलेत. गोवरची लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.तसेच पातरखेड्या सह परिसरातील गावातील ग्रामस्थांची घरोघरी जाऊन आरोग्य पथकातील कर्मचा-यांनीआरोग्य तपासणी केली.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर वाघ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अमोल पाटील,आरोग्य सहाय्यक कैलास पाटील,आरोग्य सेवक संजय ठाकूर,केशव ठाकूर,गौतम नन्नवरे,मालती कोळी,दिलीप पाटील,अतुल सोनवणे, विजय मराठे,संजय राजपूत,आधार साळुंखे,संतोष पवार,पांडुरंग आंधळे, निलेश शिंदे यांचे सह कर्मचा-यांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून गोवर आजाराबाबत जनजागृती करून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले.
आरोग्य पथकातील कर्मचारी शाळेतच ठाण मांडून आहेत.दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आश्रमशाळेला भेट देवून परिस्थितीची माहिती जाणून घेतली.तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तसेच उपचाराबाबत आरोग्य कर्मचा-यांना सुचना केल्या. याप्रसंगी त्यांच्या सोबत यावल येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार,विश्वासराव गायकवाड हे उपस्थित होते.