शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन
शिर्डी नगरीतील धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी श्री. गोरख सोनवणे यांचा आज साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गोरख सोनवणे यांनी सलग ३१ वर्षे निस्वार्थ भावनेने "साई चरित्र पारायण" करत साईबाबांच्या सेवेस समर्पित आयुष्य घालवले आहे. त्यांची ही अखंड श्रद्धा, भक्ती आणि सेवा वृत्ती संपूर्ण शिर्डी शहरासाठी प्रेरणादायक आहे.
कार्यक्रमात साई संस्थानचे इतर अधिकारी, कर्मचारी, श्रद्धावान भक्त उपस्थित होते. "भक्ती म्हणजे आचरणातील सात्विकता आणि सेवा म्हणजे कर्मातील पवित्रता" हे सोनवणे यांनी आपल्या आयुष्याने सिध्द केले आहे.
कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी त्यांचा सन्मान करताना सांगितले,
"श्री. सोनवणे यांचं साईबाबांवरील निष्ठेचं प्रतिबिंब त्यांच्या दररोजच्या सेवेत दिसून येतं. असा सेवाभाव प्रत्येक कर्मचाऱ्याने अंगीकारावा."
कार्यक्रमाचा समारोप भावपूर्ण वातावरणात झाला.