एरंडोल- येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी लोकमान्य टिळकांचा एक सुंदर प्रसंग विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतून दर्शविला. मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी शेंगा उचलणार नाही हा प्रसंग अतिशय सुंदर रित्या विद्यार्थ्यांनी सादर केला.
सामाजिक आणि देश प्रेमाचे कार्यासाठी लोकमान्य टिळकांचे योगदान तसेच अण्णाभाऊ साठे यांचे योगदान खूपच महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापिका सुरेखा प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपल्या भावना भाषणातून व्यक्त केल्या. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक जीवन मोरे यांनी शाळेसाठी लोकमान्य टिळकांची आणि अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट दिली याप्रसंगी आनंदाच्या क्षणी इयत्ता नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचा विद्यार्थी कौशल बोरसे या विद्यार्थ्याने केले, नाट्यछटेमध्ये प्रेम मोहिते या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली या नाटकात इयत्ता नववी आणि आठवीच्या मुलांनी सहभाग घेतला. मानवी पाटील, अंजली पाल, भावेश महाजन, तन्मय पाटील, कौशल बोरसे, नमन पाटील, सृष्टी महाजन, ओजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. नाटकाचे दिग्दर्शन राणी बि-हाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मनीषा पाटील, योगिता पाटील, धनश्री महाजन, राणी बि-हाडे, भाग्यश्री चौधरी, विजेंद्र सोनार सर, सागर शेंडे सर, सोनाली फुलपगार, जीवन मोरे सर पूजा प्रवीण सोनवणे यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या पार पडला.