shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमळनेर : अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न.

अमळनेर : अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
–युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, माजी शिक्षण विस्ताराधिकारी अशोक बि-हाडे, डॉ. राहुल निकम, बापूराव ठाकरे व गौतम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजनाने झाली. शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आणि सामाजिक योगदानावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी “शिक्षण हे परिवर्तनाचे शस्त्र आहे” या तत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, “अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर वंचित समाजाच्या व्यथा मांडणारे परिवर्तनाचे शिल्पकार होते. त्यांचे साहित्य समाजजागृतीचे दीपस्तंभ ठरले आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून अण्णाभाऊंच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते अरविंद सोनटक्के यांचा सत्कार मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी ईश्वर महाजन यांनी केले, तर आभारप्रदर्शन एस.के. महाजन यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेश पाटील, संभाजी पाटील व गुरुदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाज परिवर्तनाचे प्रेरणास्थान असून, अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण व बांधिलकी विकसित होत असल्याचे प्रतिपादन आयोजकांकडून करण्यात आले.


close