shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील विद्यार्थिनींनी अनेक क्षेत्रातील व्यक्तींना राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील विद्यार्थिनींनी अनेक क्षेत्रातील व्यक्तींना राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मधील विद्यार्थ्यांनींनी आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. 
रुग्णसेवेचे अखंड वृत्त हाती घेतलेल्या शासकीय रुग्णालय इंदापूर येथील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी वर्ग ज्यांनी काळ, वेळ न पाहता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली अशा डॉक्टरांच्या रूपातील देवालाच राखी बांधून आपले सलोखा व स्नेहाचे बंध जपले.
तसेच 'खाकी हीच राखी'मानून संरक्षण करणारे,आपले कर्तव्य निभावणारे पोलीस यांचाही आनंद उत्साहित करण्यासाठी,ऊन, वारा पाऊस, नैसर्गिक संकटांना सामना करत जे आपल्या तालुक्याचे रक्षण करतात अशा आपल्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्यातील आपुलकी व जिव्हाळा जागृत करण्याचे काम प्रशालेतील विद्यार्थ्यांनीनी केले.
याशिवाय ज्यांना ऐकायला व बोलायला येत नाही मूक बधिर म्हणून ज्यांची गणना होते, स्वतःच्या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेली मुले, कुचेष्टेच्या भीतीने सामान्य जनापासून चार हात दूर राहणे पसंत करतात अशा मुलांच्या पंखात बळ देण्यासाठी त्यांना आपुलकी व मायेचा आधार देऊन, राखी बांधून व तोंड गोड करून
 मूकबधिर मुलांचा आनंद द्विगुणीत केला.
रानात दिवसभर राबतो , जो अन्नदाता आहे,जगाचा पोशिंदा आहे अशा शेतकऱ्याला, शेतात  शेतीची मशागत करताना, प्रत्यक्ष बांधावर जाऊन विद्यार्थ्यांनी राखी बांधून त्यांच्या कष्टाचे मोल जाणले. 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इंदापूर येथील ऑफिस कर्मचारी, तसेच चालक, वाहक यांनाही राखी बांधून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील प्रत्येक घटकाच्या आपण काही ना काही ऋणात्मक  राहत असतो, डॉक्टरांशी स्नेहबंध, पोलिसांना पवित्र नात्याचे बंधन, स्नेह, आपुलकी, शेतकऱ्यांना हातात बळ, मूकबधिरांच्या पंखात ऊर्जा देण्याचे काम आपण करावे तरच आपली समाजाशी असलेली नाळ कायम जपली जाईल अशा विचाराचा वारसा देणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा  चित्रलेखा ढोले यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्याची प्रेरणा दिली.
भारतीय संस्कृतीला विविध सण-समारंभाचे देणे लाभलेले आहे, संस्कृतीचे जतन करायचे असेल तर विविध सण- समारंभ उत्साहाने साजरे करावेत, देशसेवेचे व देशहितासाठी  कार्य करणाऱ्यासाठी नेहमी कृतज्ञ असावे असा मोलाचा सल्ला देणारे,जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार 
प्रदीप गुरव यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबवण्याचा मोलाचा सल्ला मिळाला.
 प्रशालेतील विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला याबद्दल संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
 सदर कार्यक्रम राबवण्यासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य  राजेंद्र सरगर, शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close