बांडेवाडी शाळेतील मुलांचे पळसनाथ मंदिराच्या पवित्र ठिकाणी रक्षाबंधन साजरे.
श्रावणी सोमवाराचे औचित्य साधून पळसनाथ मंदिरास भेट.
इंदापूर : श्रावण महिना व्रतवैकल्याचा व विविध सणांचा असतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून जि प शाळा बांडेवाडी येथील शिक्षक व मुलांनी पळसदेव येथील पळसनाथ चे मनोभावे दर्शन घेतले.
बहिण भावाच्या नात्याचे प्रतीक असणाऱ्या पवित्र रक्षाबंधन सण पळसनाच्या मंदिरामध्ये आनंदात साजरा केला. सुरुवातीस मुलींनी मुलांचे औक्षण केले, राखी बांधली गोड, खाऊ दिला. मुलांनी सर्व मुलींना पेन पेन्सिल शैक्षणिक साहित्य चॉकलेट भेट दिले. यानंतर सर्व मुलांनी अंगत पंगत करून त्याच ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला.
पळसनाथ मंदिर परिसरात मुलांनी हसत खेळत, उड्या मारत, स्वच्छंदी बागडत खेळण्याचा आनंद घेतला. या छोट्याशा उपक्रमाने धार्मिक सांस्कृतिक विविध सण , परंपरा याची माहिती मुलांना अनुभवातून मिळाली. यावेळी मंदिरात आलेल्या ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेची माहिती मुलांना विचारली शाळेचा पट गुणवत्ता पाहून कौतुक केले. याकरिता मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षिका कांचन रणपिसे यांनी केले.