भोईंजे (ता. बार्शी) :
२०१९ पासून शिवजयंतीनिमित्त सुरू झालेली रक्तदानाची परंपरा कायम ठेवत, श्री रामलिंग यात्रेनिमित्त २०२५ मध्ये भोईंजे येथे नऊवे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यंदा मागील सर्व शिबिरांपेक्षा जास्त रक्तदान होऊन विक्रम प्रस्थापित झाला.
या शिबिरासाठी तसेच श्री रामलिंगाचे दर्शन घेण्यासाठी शिवश्री आनंद काशीद (संभाजी ब्रिगेड बार्शी तालुका अध्यक्ष – मराठा सेवक, गरजवंत मराठ्यांचा लढा, तालुका) यांचे सहकारी भीमराव घंदुरे (अप्पा) आणि विक्रम घायतिडक (बापू) यांनी विशेष उपस्थिती लावली.
प्रथम रक्तदानाचा मान भाऊसाहेब चव्हाण आणि शाम मुळे यांनी मिळवला. यावेळी राज बिभीषण मुळे, सचिन मुसळे यांच्यासह गावातील अनेक तरुण–तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विक्रमी रक्तदान केले. माजी सरपंच सुधीर निकम व कल्याण उमाटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रेरणादायी रक्तदान केले.
या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय महादेव गुरव यांनी केले. यावेळी रंगनाथ उमाटे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आनंद काशीद यांनी सामाजिक कार्याबद्दल दत्तात्रय गुरव यांचे अभिनंदन केले तसेच माजी सरपंच सुधीर निकम यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले.