प्रतिनिधी - एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीची नुकतीच बैठक घेण्यात आली व त्यात सर्वानुमते चेअरमन पदी राजेंद्र दोधू चौधरी तर व्हाइस चेअरमन पदी राजधर संतोष महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णयाधिकारी म्हणुन संगीता साळुंखे यांनी व सहकाऱ्यांनी काम पाहिले.
याप्रसंगी सोसायटीचे संचालक दुर्गादास महाजन,रमेश महाजन, रवींद्र महाजन, नितीन महाजन,पंडित पाटील, योगराज महाजन,विजय महाजन,इच्छाराम महाजन, सुमनबाई माळी,निर्मलाबाई महाजन तसेच संस्थेचे सचिव बापू पाटील, मन्साराम माळी,युवराज महाजन,निंबा माळी उपस्थित होते.