रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून इंदापूरच्या सौ कस्तुरबा श्रीमती कदम विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं आयडियल स्टडी ॲप*
इंदापूर : रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून इंदापूर मधील येथील सौ कस्तुरबा श्रीमती कदम विद्यालयातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे मोफत वितरण .प्रदीप गारटकर(संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंदापूर ) तसेच मुकुंद शहा (संस्थापक उप अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंदापूर)यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे अध्यक्ष नितीन शहा व वसंत माळुंजकर डायरेक्टर ई लर्निंग ॲप , नरेंद्र गांधी, नंदकुमार गुजर यांच्या हस्ते करण्यात आले.या एका स्टडी ऍप ची किंमत पंधराशे रुपये इतकी आहे.पण हे ॲप रोटरी क्लब इंदापूर कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले आहे*
यावेळी वसंतराव माळुंजकर यांनी विद्यार्थ्याना या ऍप बद्दल माहिती व फायदे सांगितले. विद्यालयाचे प्रभारी मुख्यधापक भोसले सर यांच्या अध्यक्षतेखाली आज शालेय प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला.*
*यावेळी रोटरी क्लब चे सदस्य संजय दोशी, धरमचंद लोढा, प्रमोद भंडारी, भीमाशंकर जाधव हे उपस्थित होते
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सुनील मोहिते यांनी केले.