इंदापुरात श्रीराज भरणे यांच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधन, आदिवासी दिन, ऑगस्ट क्रांती दिन संपन्न.
कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त श्रावणबाळ आश्रम, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थिनींना दिल्या भेटवस्तू.
इंदापूर: इंदापूर येथे श्री राज भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित रक्षाबंधन,वृक्षाला राखी बांधून वृक्षबंधन, ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, बाळासाहेब ढवळे, स्वप्नील राऊत, पोपट शिंदे, प्रवीण हरनावळ, दादासाहेब मोहिते, ऍडव्होकेट गवळी, सागर पवार, धरमचंद लोढा, युवा क्रांती प्रतिष्ठान चे सहकारी, वृक्ष संजीवनी परिवार, पतंजली योग समिती, जय हिंद आजी माजी सैनिक संघ, राहुल गुंडेकर, अस्लम शेख, उमेश राऊत, निलोफर पठाण, साईराज ढावरे, प्रीतम भालेराव, सौरभ शिंदे, सर्व सहकारी मित्र पदाधिकारी उपस्थित होते.
वृक्ष संजीवनी परिवारा समवेत वृक्ष बंधन :
वृक्ष संजीवनी परिवाराच्या सौ सायरा आतार व सदस्यांनी भरणे यांना मधुकामीनी वृक्षाचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान केला. अकलूज चौकातील पांडुरंगाच्या मूर्ती समोर वृक्षारोपण करून व वृक्षाला राखी बांधून वृक्ष बंधन दिन साजरा करण्यात आला.
श्रावणबाळ आश्रमातील मुलांनी समवेत रक्षाबंधन व भेटवस्तू देण्यात आले :
तसेच श्रीराम मंदिर येथील श्रावणबाळ आश्रमातील मुलांनी श्रीराज भरणे व इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केले या लहान मुलींना नित्य उपयोगी व सणासाठी वापरणाऱ्या 17 वस्तूंचे फेस्टिवल पॅक भगवानराव भरणे प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले. आश्रमातील या मुली सोबत रक्षाबंधन एक वेगळीच ऊर्जा देऊन गेल्याची माहिती भरणे यांनी दिली.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहीद स्मारकाला व थोर महापुरुषांना अभिवादन :
इंदापूर नगर परिषदेसमोर शहीद स्मारकाला नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून जय हिंद माजी सैनिक संघाच्या माजी सैनिक बांधवांच्या उपस्थितीत नगरपरिषद मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच शहीद स्मारकावर क्रांती दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना श्रीराज भरणे यांनी सांगितले की 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी करो या मरो चा नारा केला असता इंग्रजांनी सर्व मोठ्या नेत्यांना नजर कैदेत ठेवलेलं होते. त्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आदिवासींनी सर्वसामान्य नागरिकांनी हा भारतीय स्वातंत्र्याचा लढा आपल्या हाती घेतला. कोणताही नेतासोबत नसताना एक लीडरलेस रिबेल एक जनक्रांती झाली. इंग्रजांचा दिसेल तिथं येथील नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली. तिथली दळणवळण व्यवस्था, रस्ते , पोस्टची तर सुविधा व्यवस्था रेल्वेचे रूळ नागरिकांनी उध्वस्त केले. इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि येथील सर्वसामान्य नागरिकांनी कष्टकऱ्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून घोषित केलं. हेच ती नऊ ऑगस्ट क्रांती या क्रांती दिनी सर्व माजी सैनिकांना नागरिकांना महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय नेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लाखो शहिदांना मी विनम्र अभिवादन करतोअसे श्रीराज भरणे यांनी मार्गदर्शन केले.
आज आदिवासी दिनाच्या औचित्य साधून इंदापूर नगरपरिषद समोरील आदिवासी कुटुंबांसमवेत उपोषणाला बसलेल्या आदिवासी महिलांशी चर्चा केली श्रीराज यांनी इंदापूरचे मुख्याधिकारी ढगे यांना फोनवरून त्या पद्धतीने सूचना केल्या
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज येथे आदिवासी दिन,रक्षाबंधन, कार्यक्रमाला उपस्थित राहून आदिवासी मुलींना भेटवस्तू दिल्या :
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज दत्तनगर येथे आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात उपस्थित राहून आदिवासी मुलींच्या हस्ते रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. जय इन्स्टिट्यूट त्या सर्व स्टाफला व विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आदिवासी दिनानिमित्त पारंपारिक आदिवासी नृत्य स्वागत गीत या ठिकाणी सादर करण्यात आले. यावेळी आदिवासी पद्धतीने केलेला सन्मान मनाला भावणारा होता.
आदिवासी दिन, रक्षाबंधन व नऊ ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी विविध ठिकाणच्या गोरगरीब कष्टकरी गरजू आदिवासी बहिणींना सुमारे 200 बहिणींना रक्षाबंधनाचे एक छोटेसे गिफ्ट भगवानराव भरणे प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले.