शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
पुणे शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रुती पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना श्री साईबाबांची पवित्र शाल व ऊदी देऊन गौरविण्यात आले. श्री साईबाबांच्या कृपेने आणि समाजसेवेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना ओळख देण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला.
समाजातील महिला आरोग्य, मातृत्व आणि स्त्रीरोग क्षेत्रात डॉ. पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा हा विशेष सत्कार झाला. त्यांच्या उपचारपद्धतीत रुग्णांप्रती असलेली जिव्हाळ्याची भावना आणि सेवाभावामुळे त्या सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
यावेळी उपस्थित दिपाली महाजन आणि अक्षय महाजन यांनी डॉ. पाटील यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साईबाबांच्या शाल आणि ऊदीचा सन्मान मिळाल्याबद्दल डॉ. श्रुती पाटील यांनी आभार मानले आणि पुढेही रुग्णसेवेला आपले जीवन समर्पित ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
००००