shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी चर्चेस नकार दिल्याने मेल नर्सेस बचाव समितीचे पदाधिकारी आक्रमक मंत्रालया समोर जोरदार निदर्शने

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

शासकीय आधिपरिचारिका पदभरती मध्ये *महिला आरक्षण 80 %* आणि *पुरुष आरक्षण फक्त 20%* असा आर. आर. प्रसिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग संघटना,खाजगी नर्सिंग संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक,मेल नर्सिंग विद्यार्थी, पालक आणि नर्सिंग ऑफिसर्स, यांच्या मध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून दीड महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध पद्धतीने लोकशाही, संविधाननिक, शांततेच्या मार्गाने राज्य शासनाविरुद्ध आंदोलने चालू होते त्याचाच एक भाग म्हणून आझाद मैदान मुंबई येथे 5 ऑगस्ट रोजी एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.ते चालू असताना अचानक पणे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.हसन मुश्रीफ साहेब आंदोलनाला भेट देणार नाहीत अशी कुजबुज आंदोलकांमध्ये पसरली त्यामुळे राज्यातील सर्व मेल नर्सेस ला याची प्रचंड चीड आली व मेल नर्सिंग विद्यार्थी, मेल नर्सेस बचाव समितीचे सर्व राज्य पदाधिकारी यांनी मंत्रालय परिसरात संबंधित मंत्र्यांना भेटण्याची,निवेदन घेण्याची विनंती केली मात्र कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यामुळे मेल नर्सिंग विद्यार्थी ,पदाधिकारी यांनी मंत्रालयासमोरच आपला राग काढायला सुरुवात केली आणि शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तेंव्हा काही काळ तिथे प्रचंड गदारोळ उडाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला,आंदोलक मेल नर्सिंग विद्यार्थी, पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले त्यानंतर राज्य शासनाच्या (DMER ) वतीने संचालक डॉ .चंदनवाले साहेब यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि बैठकी साठी पत्र देण्यात आले त्यामुळे आंदोलक मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सेस बचाव समिती चे पदाधिकारी शांत झाले व आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
close