*जेणेकरून साईबाबा संस्थांनची प्रतिष्ठा आबाधित राहील शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर* *कोते*
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांबद्दल होणाऱ्या चुकीच्या अफवा, आर्थिक फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या कृत्यांवर प्रतिबंध करण्यासाठी अधिकृत धोरण व यंत्रणा राबविण्याबाबत आज श्री साईबाबा संस्थांनला अर्ज देण्यात आलेले आहे त्यात ग्रामस्थ्यांच्या वतीने कमलाकर कोते म्हटले आहे कि, अलीकडील काळात समाजमाध्यमांवर व विविध माध्यमांतून श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांबाबत अपुऱ्या माहितीतून व गैरसमजातून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच काही व्यक्ती किंवा गटांकडून –
श्री साईबाबांच्या वस्तू आपल्याकडे असल्याचा खोटा दावा करून भक्तांची दिशाभूल व आर्थिक देणगी गोळा करणे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या नावाखाली भक्तांकडून पैसे मागणे.
फेक सोशल मीडिया अकाउंट तयार करून ऑनलाईन रूम बुकिंग, दर्शन पास किंवा अन्य सेवा उपलब्ध असल्याचे दाखवून भक्तांची फसवणूक करणे.
वरील प्रकारांमुळे श्री साईबाबा संस्थानची प्रतिमा व भक्तांचा विश्वास दोन्ही बाधित होत असून अनेक निरपराध भक्तांचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्यामुळे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानने खालील उपाययोजना राबवाव्यात,
अधिकृत धोरण – अशा अफवा, खोटे दावे व फसवणुकीबाबत संस्थेचे स्पष्ट व लिखित धोरण जाहीर करणे.
अभ्यास गट – या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती / अभ्यास गट स्थापन करणे.
सोशल मीडिया मॉनिटरिंग समाजमाध्यमांवरील चुकीची माहिती व फेक अकाउंट ओळखण्यासाठी व त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी सायबर क्षेत्रातील नामांकित एजन्सीची नेमणूक करणे.
कायदेशीर सहाय्य – सायबर कायद्यात तज्ज्ञ असणाऱ्या नामांकित वकिलांचा पॅनल तयार करणे,
पोलिस कारवाई पॅनल – पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी संस्थानचे अधिकारी यांचा विशेष पॅनल निश्चित करणे.
वरील उपाययोजना राबवल्यास, श्री साईबाबा संस्थानची प्रतिष्ठा अबाधित राहील, भक्तांचा विश्वास दृढ होईल व अशा प्रकारच्या फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल
आपण या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा असे अश्याचे पत्र ग्रामसतांतर्फे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी श्री साईबाबा संस्थांनाला दिला आहे.