शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया तर्फे 'तंबाखू मुक्त शाळा आणि शालेय परिसर' उपक्रमा अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
व्ही.पी.एस मध्ये नेहमीच शासनाच्या नवनवीन उपक्रमा अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात येते. शासनाच्या तंबाखू मुक्त शाळा आणि शालेय परिसर उपक्रमांतर्गत प्रशालेतर्फे लोणावळा शहरातील गजबजलेल्या परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅली ची सुरुवात प्रशालेपासून लोणावळा मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थी, स्काऊट आणि गाईड यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, वरिष्ठ लिपिक आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
प्राचार्य श्री.सुहास विसाळ आणि उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ यांनी रॅलीचे महत्त्व सांगितले. रॅली चे नियोजन श्री.वैभव सूर्यवंशी यांनी केले. श्री.योगेश कोठावदे आणि श्री.संजय पालवे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.