श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भारतीय जैन संघटना संचलित, भगीरथ एज्युकेशन सोसायटीचे, आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सात्रळ, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नागपंचमी सणानिमित्त महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य मधुकर अनाप यांनी सर्पविषयक प्रबोधनातून संवाद साधला.
सापाविषयी असलेले समज गैरसमज, अंधश्रद्धा, सापाचे पर्यावरण साखळीतील महत्त्व, विषारी बिनविषारी साप सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी या संबंधी विद्यार्थ्यांशी माहिती पूर्ण पीपीटी आणि व्हिडिओद्वारे संवाद साधला. सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असून त्याला अभय देण्याविषयी उपस्थितांनी शपथ घेतली.
यावेळी संस्थाचालक डॉ. राहुल बोरा,अर्चना प्रधान मॅडम (प्राचार्या) भाग्यश्री साबळे मॅडम (उप प्राचार्या)
शितल जेजुरकर मॅडम, कविता जोर्वेकर मॅडम, अभिजीत गायकवाड सर, सचिन परदेशी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111