शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
शिर्डी प्रयागराज येथील अभूतपूर्व आणि भव्य अशा यशस्वी महाकुंभ मेळ्यानंतर २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभ मेळा होणार आहे त्यासाठी राज्य सरकार आतापासूनच नियोजन करत आहे हे अभिनंदनीय आहे.त्यादृष्टीने शिरडी विमानतळ टर्मिनस इमारत,पुणतांबा-शिरडी रेल्वे मार्ग दुहेरीकरण,अहिल्यानगर-शिरडी रस्ता नव्याने बांधणीबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतले आहेत.
परंतु नाशिक नंतर सर्वाधिक गर्दी शिरडीला साईबाबांच्या दर्शनासाठी होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्ते मार्गे होणारी गर्दी शिरडी शहरातील अपूर्ण असलेला रिंग रोड पूर्ण झाला तर त्या रस्त्याने वळविल्यास मंदिर परिसरात गर्दी नियंत्रण ठेवणे सहज शक्य होईल त्याचप्रमाणे रेल्वेने येणारे प्रवासी यांच्यासाठी साईनगर शिरडी रेल्वे स्थानक ते शिरडी शहर असा वॉटर पार्क,साई उद्यान इमारत मार्गे हा विभागीय आराखड्यात प्रस्तावित असलेला रस्ता होणे गरजेचे आहे जेणेकरून रेल्वे ने येणारे साईभक्त आणि यात्रेकरू यांच्या रहदारीचा नगर मनमाड रोडवर अनावश्यक ताण पडणार नाही त्याच बरोबर हॉटेल साईश ते साई गणेश गॅस एजन्सी हा पिंपळवाडी रोडचा अरुंद असलेला भाग रुंदीकरण केला तर पुणतांबा मार्गे येण्यासाठी सोईस्कर होईल तरी वरील तीन रस्त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा असे विनंती केली आहे.