भामाठाण:- श्रीक्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी, भामानगर (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे धार्मिक वातावरण अधिकच पवित्र करणारा विशेष सोहळा येत्या १५ ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीच्या महापर्वावर आयोजित करण्यात आला आहे. अडबंगनाथ संस्थानने नवनाथ ग्रंथाचे नवीन संपादित स्वरूप प्रकाशित केले असून, या ग्रंथामध्ये मूळ ७६०० ओव्या व ४० अध्याय असलेल्या ग्रंथावर नव्याने लेखन करून, अध्याय ४० मध्येच १३०० ओव्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हा ग्रंथ भाविकांना एका दिवसात पारायण करता यावे या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
या अद्वितीय ग्रंथाचे प्रकाशन ९ ऑगस्ट पौर्णिमेला झाले असून, त्याचा एकदिवसीय सामुदायिक पारायण सोहळा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता, श्रीक्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी भामानगर येथे होणार आहे. धर्मप्रेमी व नवनाथ भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन जन्मोजन्मीच्या भाग्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
पारायणासाठी इच्छुक भाविकांनी नावनोंदणी त्वरित करून ठेवावी. तसेच या कार्यक्रमातील महाप्रसादासाठी सहकार्य करू इच्छिणाऱ्या भक्तांनी ऑनलाईन (Google Pay/PhonePe – 9921773005) किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले योगदान द्यावे.
संपर्क क्रमांक:
📞 7588605305
📞 7020902470
तुका म्हणे – ऐशा लाभा जो चुकला, वाया गेला. त्यामुळे निश्चित सर्वांनी या महापवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा.
००००