shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"कमवा व शिका" आणि आर्थिक दुर्बल योजना अंतर्गत एरंडोल महाविद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना ३.१९ लाखांची आर्थिक मदत.

"कमवा व शिका" आणि आर्थिक दुर्बल योजना अंतर्गत एरंडोल महाविद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना ३.१९ लाखांची आर्थिक मदत.

प्रतिनिधी
– एरंडोल येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विद्यार्थ्यांना "कमवा व शिका योजना" व आर्थिक दुर्बल घटक योजना अंतर्गत एकूण ३ लाख १९ हजार ५४० रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

ही मदत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंजूर करण्यात आली आहे.

"कमवा व शिका योजनेतून" महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांना २ लाख ६ हजार ४० रुपये, तर आर्थिक दुर्बल घटक योजनेतून १९ विद्यार्थ्यांना १ लाख १३ हजार ५०० रुपये इतकी मदत मिळाली.

या योजनांचा उद्देश आर्थिक अडचणीत असलेल्या, शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यात असमर्थ असलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी देणे हा आहे. यात पितृहरप, शेतकरी आत्महत्या, कोविड मृत्यू, बीपीएल कार्डधारक आदी निकषावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी धनादेश वितरण समारंभ महाविद्यालयात पार पडला. अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील, प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए.ए. बडगुजर, कुलसचिव श्री. एस.एस. बोरसे, विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. एस.एम. साळुंखे, सहायक अधिकारी डॉ. एस.व्ही. शेलार, डॉ. यू.पी. गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

कार्यक्रमात प्रा. क.जे. वाघ, प्रा. ए.टी. चिमकर, डॉ. एन.एस. तायडे, डॉ. आर.एस. वानखेडे, डॉ. बि.व्ही. पवार, डॉ. एस.एल. कोतकर, प्रा. योगेश येंडाईत, डॉ. अतुल पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्ष अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

close