पारोळा | प्रतिनिधी अमळनेर व पारोळा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्यांनी शेतकऱ्याकडून बांबू लागवडीसाठी ४०,००० रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जळगाव यांच्याकडून केलेल्या सापळा कारवाईत तीन जणांना ३६,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
✅ अटकेतील आरोपी:
1. मनोज बबनराव कापूरे (54 वर्षे)वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा व अति. कार्यभार अमळनेर (वर्ग - 2)
2. निलेश मोतीलाल चांदणे (45 वर्षे)लिपिक, सामाजिक वनीकरण कार्यालय, पारोळा (वर्ग - 3
3. कैलास भरत पाटील (27 वर्षे)
कंत्राटी चालक, रा. मोरफळ, ता. पारोळा
💸 लाच मागणी आणि कारवाई:
शेतकरी तक्रारदार व त्यांच्या तीन नातेवाईकांनी सडावण शिवारात अमृत महोत्सवी फळझाड व फुलपिक लागवड योजनेसाठी ४ फाईल मंजूर करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा येथे दि. २३ जुलै रोजी भेट घेतली होती. यावेळी आरोपी अधिकारी प्रत्येक फाईलसाठी १०,००० रुपये, एकूण ४०,००० रुपयांची लाच मागत असल्याचे उघड झाले.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ५ ऑगस्ट २०२५ रोजी ACB जळगाव कडे तक्रार दिली. पडताळणी दरम्यान आरोपी क्र. १ आणि २ यांनी ३५,०००/- स्वतःसाठी व १,०००/- आरोपी क्र. २ साठी अशी तडजोडीअंती ३६,०००/- रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
ACB च्या साक्षीदारांच्या समोर आरोपी क्र. ३ कैलास पाटील याने ही रक्कम स्वीकारली, आणि त्याच वेळी तिघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.
📍 पुढील कार्यवाही:
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, लाच रक्कमेची हॅश व्हॅल्यू देखील घेतली आहे.
👮 तपास व मार्गदर्शन:
पर्यवेक्षण अधिकारी:
श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ACB जळगाव
📞 9702433131
तपास अधिकारी:
श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ACB जळगाव
मार्गदर्शक अधिकारी:
मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
📞 8888832146
मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
📞 9404333049
💬 टिप्पणी.
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी भ्रष्टाचार करणारे अधिकारी ही कृषीप्रधान देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा लाचखोरांवर कठोर कारवाई होऊन इतरांना धडा मिळावा, हीच अपेक्षा!