shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत वृक्षांना राख्या बांधून एक पेड माँ के नाम या अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे*

*गौराईमळा शाळेत वृक्षांना राख्या बांधून  एक पेड माँ के नाम  या अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे*
इंदापूर दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषदच्या गौराईमळा शाळेत रक्षाबंधन साजरे
करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्व पटावे व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. असे शाळेतील उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी सांगितले. शाळेतील सर्व मुलींनी मुलांना ओवाळून राख्या बांधल्या व मुलांनी त्यांना ओवाळणी म्हणून पेन, पेन्सिल व इतर वस्तु भेट दिल्या. राखी बांधल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काही मुलींनी वृक्षांना राख्या बांधून निसर्गाचे व बहीण भावाचे अतूट नाते असते हा संदेश दिला. तसेच ज्या प्रमाणे आपण जीवनात भावाची काळजी घेतो त्या प्रमाणे झाडांना राख्या बांधुन,"भाऊ  जसा आपले रक्षण करतो तसेच झाडेही आपल्याला न थकता आयुष्यभर ऑक्सिजन देतात ," आपणही भावा प्रमाणे झाडांची काळजी घ्यावी हा संदेश बाल गोपाळांनी दिला .
           यावेळी शासन निर्णय व जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशाने सन २०२५:२०२६ मध्ये 'एक पेड माँ के नाम 'हा उपक्रम शाळेत एकाच दिवशी साजरा करण्यात आला .त्याचे महत्व पालकांना व मुलांना सांगितले. या मध्ये सर्व पालकांना सुचना करण्यात आली की  प्रत्येक आईने व मुलामुलींनी एक पेड माँ के नाम लावुन त्याचे रक्षण करावे. तसेच हा फोटो एक पेड माँ के नाम या साईट वर अपलोड करण्यात येवुन. त्या प्रमाणे सर्व मुलांना प्रमाणपत्र प्राप्त करुन देण्यात आली. 
           या निमित्ताने मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर अंगणवाडी सेविका सुनिता सोनवणे  मॅडम , मदतनीस कल्पना जाधव मॅडम , मनिषा जाधव व पालक उपस्थित होते .
close