shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईसेवा मतिमंद विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त स्तवन मंजिरी पठण*


शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
 धार्मिक बातमी

   आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे श्री गणेश उत्सवानिमित्त स्तवन मंजिरी पठण कार्यक्रम घेण्यात आला.

   गणेश उत्सव, ज्याला गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान गणेशाचा जन्मदिवस साजरा करतो आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला सुरू होतो.
     या गणेशोत्सवाच्या निमित्ताने साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे मा. डॉ. धनंजयजी जगताप व ग्रुप यांसकडून साईबाबा स्तवन मंजिरी पठण करण्यात आले व श्री गणेशांची आरती घेण्यात आली.तसेच पर्यावरण शपथ घेण्यात आली. तसेच नगरपरिषद शिर्डी येथील माजी नगरसेवक श्री अशोकभाऊ गोंदकर यांच्या हस्ते श्री गणेशांची आरती करण्यात आली.
   हा सर्व कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.
close