शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
धार्मिक बातमी
न्याहाळोद_न्याहाळोद ता.जि. धुळे येथे गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्री ठीक ८.०० वा.माळी मढीत शनिसाधक श्री. देवेंद्र पांढरकर यांच्या कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप सदाशिव माळी यांनी केले होते.या कार्यक्रमात राजा विक्रम,श्रीकृष्ण,वडिलांना लागलेली साडेसाती या कथांचे निरूपण करण्यात आले.मोठ्या देवांचे फोटो लावून,साधना करून,पूजा पाठ करून देव भेटत नसतो तर माणसाचे कर्म चांगले पाहिजे.पद आणि पैसा आले की, लई गर्व करू नका.दुसऱ्याला तुच्छ समजू नका.सत्ता गेली की काही किंमत राहत नाही.वेळ सगळ्यांची येते आणि गरज सुद्धा प्रत्येकाला असते म्हणून कधीही गर्व आणि माजात जगू नका.गर्व,घमंड,आणि अहंकार,मुळे माणसाचे प्रचंड नुकसान होऊ शकते.म्हणून मानवी जीवन कल्याणासाठी व कुटुंब व्यवस्था प्रबळ होण्यासाठी कधीही गर्व,घमंड आणि अहंकार नाहीसा झाला पाहिजे असा मोलाचा संदेश देण्यात आला.त्यांनी २००२ पासून संगीत व विना संगीताने मराठी/हिंदी/अहिराणी भाषेत एकूण २३३ कथा सांगितले आहेत.कथा सांगताना ते कोणतीही दक्षणा न घेता विनामूल्य काम करतात. त्यांनी आतापर्यंत राजा विक्रम, गुरु महाराज,हनुमंत,राम,रावण श्रीकृष्ण,राजा हरिश्चंद्र या देव देवतांच्या अनेक कथा सांगितले आहेत.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,माजी सरपंच कैलास पाटील,पत्रकार विशाल रायते, राकेश शिरसाठ सर,गणेश धोबी,केवल माळी,निंबा माळी,परमेश्वर माळी, पैलवान ज्ञानेश्वर माळी,भालचंद्र माळी,सुमित उर्फ सोनू माळी, हंसराज महाजन,पेंटर हंसराज वाघ,कृष्णदास कुंभार सर,आदर्श शेतकरी कैलास रोकडे,आबा दौलत रोकडे,धनराज रोकडे, भालचंद्र माळी,विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ,इ.मान्यवर उपस्थित होते.