shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🚩 शिर्डीचा अभिमान!चैतन्य संजय कोते पाटील यांची भारतीय नौदलात निवडमातोश्री जयश्रीताई कोते पाटील आणि शिक्षक मनीष पाटील सरांचा संस्थेच्या वतीने भव्य सत्कार

शिर्डी प्रतिनिधी: (संजय महाजन)

सामाजिक बातमी

शिर्डीच्या सुवर्णमयी इतिहासात पुन्हा एकदा एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी अध्यायाची भर पडली आहे. शिर्डीतील जिद्दी आणि कर्तृत्ववान तरुण चैतन्य संजय कोते पाटील यांनी कठोर मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांच्या बळावर भारतीय नौदलात प्रवेश मिळवत शिर्डीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे.



या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्था, शिर्डी तर्फे चैतन्यचे मातोश्री आदरणीय जयश्रीताई संजय कोते पाटील आणि मार्गदर्शक शिक्षक मा. मनीष पाटील सर यांचा भव्य सत्कार आणि सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. महेमुदभाई सय्यद, विद्यमान अध्यक्ष दादाभाई इनामदार, उपाध्यक्ष मुख्तारभाई शेख, तसेच जावेदभाई शाहा, अश्रफभाई सय्यद, साजिदभाई शेख, जलीलभाई पठाण, जुबेरभाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

चैतन्य कोते पाटील यांचे हे यश शिर्डीच्या तरुणांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत असून त्यांच्या कुटुंबीयांचा आणि शिक्षकांचा हा गौरव सोहळा सर्वांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंदाची झळाळी घेऊन आला.


close