*राज्यस्तरीय ऋतुरुंग रंगभरण स्पर्धेत जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी स्कूलचे घवघवीत यश*
*इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल उपक्रमशील शाळा म्हणून गौरविण्यात आले*
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न पुणे जिल्हा
कलाध्यापक संघ आयोजित, राज्यस्तरीय ऋतुरंग रंगभरण चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक 30 जुलै २०२५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे संपन्न झाला. या स्पर्धेतील विजेत्या बाल चित्रकारांचा गुणगौरव समारंभासाठी अंधासाठी चित्र सुलभ करणारे,दूरदृष्टी चित्रकार चिंतामणी हसबनीस व जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या स्पर्धेमध्ये प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलच्या एकूण 9 विद्यार्थ्यांनी व विद्या निकेतन स्कूल अँड जुनिअर कॉलेज च्या एकूण 7 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
*प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलमधील यशस्वी विद्यार्थी*
1) आरुषी बंडू चव्हाण गट-अ - प्रथम क्रमांक
2) स्वरा रत्नाकांत घोगरे गट- अ - तृतीय क्रमांक
3) आराध्या सम्राट खेडकर गट - ब - प्रथम क्रमांक
4) दिव्या परमानंद कोकाटे गट - ब - द्वितीय क्रमांक
5) आयुष राहुल क्षीरसागर गट- क - प्रथम क्रमांक
6) प्रज्ञा संजय कांबळे गट - क - द्वितीय क्रमांक
7) प्रांजली निलेश कुचेकर गट - क - तृतीय क्रमांक
8) पृथ्वी संदीप धनवडे गट - क - प्रथम क्रमांक
9) तनिष्का गणेश जाधव-देशमुख गट - क - द्वितीय क्रमांक
*विद्या निकेतन स्कूल अँड जुनिअर कॉलेजमधील यशस्वी विद्यार्थी*
1) राजनंदिनी अमोल गुरव गट - अ - द्वितीय क्रमांक
2) प्रियांश भैया काळे गट - अ - तृतीय क्रमांक
3) नम्रता महादेव घोगरे गट - ब - प्रथम क्रमांक
4) आरोही सुयोग फोंडे गट - क - प्रथम क्रमांक
5) अनन्या अंबादास येरळकर गट - क - तृतीय क्रमांक
6) सृष्टी हर्षवर्धन पवार गट - ड - प्रथम क्रमांक
7) अनुष्का महेंद्र पडळकर गट - ड - द्वितीय क्रमांक
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक दिपाली चव्हाण, ट्विंकल देशमुखे, निकिता भोई यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी या दोन्ही प्रशालेला उपक्रमशील शाळा म्हणून गौरविण्यात आले तसेच प्रशालेतील उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणूनही गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल, प्रशालेच्या नावलौकिकाबद्दल *संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले , उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले ,सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच भरभरून कौतुक केले.*